VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 24 May 2022

| Updated on: May 24, 2022 | 1:33 PM

एचआयव्ही ग्रस्तांना नेहमीच समाजातील दुर्लक्षित घटक म्हणून पाहिलं जातं. अनेक सामाजिक संस्था अशा व्यक्तींसाठी झटत असतात. पण जिल्हा प्रशासनाने स्वतःहून पुढाकार घेत या व्यक्तींसंदर्भात कौतुकास्पद उपक्रम राबवण्याचे फार कमी वेळेच ऐकिवात येते. बीडमध्ये असाच एक स्तुत्य उपक्रम पार पडला. एचआयव्हीग्रस्त बीडमध्ये  मात्र अशा सात जोडप्यांना एकत्र आणून जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी सामूहिक विवाह सोहळा  घडवून आणलाय.

Follow us on

एचआयव्ही ग्रस्तांना नेहमीच समाजातील दुर्लक्षित घटक म्हणून पाहिलं जातं. अनेक सामाजिक संस्था अशा व्यक्तींसाठी झटत असतात. पण जिल्हा प्रशासनाने स्वतःहून पुढाकार घेत या व्यक्तींसंदर्भात कौतुकास्पद उपक्रम राबवण्याचे फार कमी वेळेच ऐकिवात येते. बीडमध्ये असाच एक स्तुत्य उपक्रम पार पडला. एचआयव्हीग्रस्त बीडमध्ये  मात्र अशा सात जोडप्यांना एकत्र आणून जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी सामूहिक विवाह सोहळा  घडवून आणलाय. त्यामुळे व्यथित होऊन निराशामय जीवन जगणाऱ्या एचआयव्हीग्रस्तांना कायमस्वरूपी आधार मिळालाय. बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी कन्यादान केले. सुनील लांजेवार यांनी मणी मंगळसूत्र देऊन सामाजिक जबाबदारी पार पडली तर अजित पवार यांनी संसारउपयोगी साहित्य दिले.