दे धक्क्याला ब्रेक! आता 5 वी, 8 वी पास असाल तरच पुढच्या वर्गात प्रवेश; काय आहे नवीन नियम
‘शिक्षण हक्क कायद्यासंदर्भात’ही आता बदल करत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याच्याआधी शालेय शिक्षण विभागाकडून आठवीपर्यंत सरसकट पास केलं जात होतं. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
पुणे : राज्यातील नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. त्याच्याआधी शालेय शिक्षण विभागाकडून काही महत्तपुर्ण निर्णय घेतले आहेत. त्यातच ‘शिक्षण हक्क कायद्यासंदर्भात’ही आता बदल करत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याच्याआधी शालेय शिक्षण विभागाकडून आठवीपर्यंत सरसकट पास केलं जात होतं. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे ‘शिक्षण हक्क कायद्यांतर्गत होणारं दे धक्का, ढकलं पास हे बंद झालं आहे. त्यामुळे आता जर पुढच्या वर्गात जायचं असेल तर विद्यार्थ्यांना पाचवी आणि आठवीची वार्षीक परिक्षा ही उत्तीर्ण व्हावी लागेल. सरकारने नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा निर्णय जाहीर केला आहे.
Published on: Jun 24, 2023 08:44 AM
