Datta Gade Arrested Video : ‘दत्ता मी येतोय…’, आरोपीसह पोलिसांचा पहिला संवाद अन् गोड बोलून 70 तासानंतर आवळल्या मुसक्या
पुणे अत्याचार प्रकरणातील आरोरी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली आहे. तब्बल 70 तासांच्या शोधमोहिमेनंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. गुनाट गावातून ग्रामस्थांच्या मदतीने, पोलिसांनी आरोपी गाडेला अटक केली आहे.
पुणे स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. या संतापजनक घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सर्वच स्तरातून मागणी होत असताना आरोपी दत्तात्रय गाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याची माहिती मिळताच आरोपी फरार झाला. गेल्या तीन दिवसांपासून फरार असलेला आरोपी शिरूर येथील गुनाट गावातील शेतात लपून बसला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या 13 टीम, गावातून पळू नये म्हणून गावात 100 पोलिसांचा बंदोबस्त, तसेच ड्रोनच्या आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने त्याचा कसून शोध सुरू होता. अखेर 70 तास सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. काल दिवसभर पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून दत्तात्रय गाडेचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. रात्री. 11.45 च्या सुमारास आरोपी गाडे हा एका घरात पाणी पिण्यासाठी गेला होता. तो ज्या घरात पाणी प्यायला, त्या घरातील महिलेने पोलिसांना फोन करून गाडेची माहिती दिली. पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आतच गाडेला चारही बाजूंनी घेरलं आणि मध्यरात्री 1 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
