देशाचं नाव मोठं करायचय

देशाचं नाव मोठं करायचय

| Updated on: Jul 13, 2022 | 8:59 PM

विम्बल्डन टेनिस स्पर्धेसाठी देशातून एकमेव निवड झालेल्या कोल्हापूरच्या 14 वर्षांखालील ऐश्वर्या जाधवला पराभव स्वीकारावा लागला असला तरी पहिल्या प्रयत्नात तिने जागतिक पातळीवर आपल्या खेळाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या रोमानियाच्या अॅन्ड्रिया सोरविरुद्ध तिला संघर्षपूर्ण लढतीत पराभव स्वीकारावा लागला. पहिल्याच प्रयत्नात दमदार एंट्री करून लक्ष वेधणाऱ्या ऐश्वर्या सांगते की, खेळ चांगला […]

विम्बल्डन टेनिस स्पर्धेसाठी देशातून एकमेव निवड झालेल्या कोल्हापूरच्या 14 वर्षांखालील ऐश्वर्या जाधवला पराभव स्वीकारावा लागला असला तरी पहिल्या प्रयत्नात तिने जागतिक पातळीवर आपल्या खेळाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या रोमानियाच्या अॅन्ड्रिया सोरविरुद्ध तिला संघर्षपूर्ण लढतीत पराभव स्वीकारावा लागला. पहिल्याच प्रयत्नात दमदार एंट्री करून लक्ष वेधणाऱ्या ऐश्वर्या सांगते की, खेळ चांगला झाला मात्र पराभव झाला असला तरी मला एक प्रकारचा चांगला धडा मिळाला असल्याचेही तिने सांगितले. टेनिस खेळण्यासाठी तिच्या घरातील जसं तिला मदत करतात तसच तिला तिच्या शाळेकडूनही मदत केली जाते. त्यामुळे भविष्यात तिला कोल्हापूरचं नाव तर मोठं करायचच आहे मात्र भारताचं नावही तिला जगात गाजवायचं आहे.

Published on: Jul 13, 2022 08:57 PM