Ambadas Danve : मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसूनही चक्रमपणा करतील; दानवेंचा शिरसाट यांना खोचक टोला

Ambadas Danve : मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसूनही चक्रमपणा करतील; दानवेंचा शिरसाट यांना खोचक टोला

| Updated on: Jun 03, 2025 | 5:47 PM

Ambadas Danve Slams Sanjay Shirsat : पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यावर आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.

चक्रम, वेडे लोक मंत्रिमंडळात कसे? असा प्रश्न शिवसेना उबाठा गटाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. घर जाळेन म्हणणाऱ्यांना मंत्रिमंडळात कसं ठेवलं? असंही यावेळी दानवे यांनी म्हंटलं आहे. मी याबाबत राज्यपालांना पत्र लिहिणार असल्याचं देखील अंबादास दानवे यांनी सांगितलं.

संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी काल हॉटेल विट्सच्या लिलाव आणि खरेदी प्रकरणातील वादावर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मी चक्रम आणि वेडा माणूस आहे. तुमची गुपित माझ्याकडे आहेत. मी घर आग लावायला कमी करणार नाही, असं शिरसाट यांनी विरोधकांवर टीका करताना म्हंटलं होतं. त्यावर आज दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दानवे म्हणाले की, शिरसाट स्वत: काल म्हणाले आहेत. मी चक्रम आहे, मी वेडा आहे. मग असे चक्रम आणि वेडे लोक मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात कसे ठेवले? याबद्दल मी राज्यपालांना पत्र लिहिणार आहे. उद्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसून त्यांनी काही चक्रमपणा केला तर नवीन काही गोष्टी होतील, असा खोचक टोला दानवे यांनी लगावला आहे.

Published on: Jun 03, 2025 05:47 PM