Video : केतकी चितळेला कठोर शिक्षा झालीच पाहिजे- आसावरी जोशी

Video : केतकी चितळेला कठोर शिक्षा झालीच पाहिजे- आसावरी जोशी

| Updated on: May 16, 2022 | 4:19 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात अभिनेत्री केतकी चितळेनं (Ketaki Chitale) फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केतकीविरोधात मुंबईतही तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिने लिहिलेल्या पोस्टनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टीकेची झोड सुरू केली. आता कलाविश्वातील अनेक मंडळींनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अभिनेत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाची महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा […]

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात अभिनेत्री केतकी चितळेनं (Ketaki Chitale) फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केतकीविरोधात मुंबईतही तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिने लिहिलेल्या पोस्टनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टीकेची झोड सुरू केली. आता कलाविश्वातील अनेक मंडळींनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अभिनेत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाची महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा आसावरी जोशी (Asawari Joshi) आणि अभिनेत्री मानसी नाईक हिनेसुद्धा केतकीवर टीका केली आहे. “सोशल मीडियावर आपण काहीही पोस्ट करू शकतो, रिपोस्ट करू शकतो असं जर का प्रत्येकाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे,” असं आसावरी म्हणाल्या. तर असं पुन्हा कोणी करू नये म्हणून कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया मानसी नाईकने दिली.

Published on: May 16, 2022 04:19 PM