CM Devendra Fadnavis : ‘अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली’, फडणवीसांचं विरोधकांना मिश्किल प्रत्युत्तर

CM Devendra Fadnavis : ‘अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली’, फडणवीसांचं विरोधकांना मिश्किल प्रत्युत्तर

| Updated on: Mar 19, 2025 | 4:53 PM

Assembly Session : विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज निवेदन सादर करताना केलेल्या मिश्किल विनोदामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज आकरावा दिवस आहे. नागपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून आज विरोधक सभागृहात चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. विरोधकांनी यावेळी सभागृहावर बहिष्कार टाकल्याने काही वेळासाठी सभागृहाचं कामकाज काहीवेळासाठी स्थगित देखील करण्यात आलं होतं.

यावेळी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर करण्यास सुरुवात केल्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडलं. ‘चॉकलेट नको न्याय द्या’, अशा घोषणा यावेळी विरोधकांनी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर ‘अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी देण्याचा प्रयत्न केला. तेही साधी कॅडबरी नाही तर डेरिमिल्क देण्याचा प्रयत्न केला आहे.’ असा मिश्किल विनोद केला. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

Published on: Mar 19, 2025 04:53 PM