Special Report | जुनी प्रकरणं Raj Thackeray यांच्या अडचणी वाढवणार?

Special Report | जुनी प्रकरणं Raj Thackeray यांच्या अडचणी वाढवणार?

| Updated on: May 06, 2022 | 9:26 PM

औरंगाबाद सभेनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले गेले आहेत. त्यातच आता दोन अजामीनपात्र वॉरंट निघाले असून त्यांना अटक होणार का अशी चर्चा आहे.

औरंगाबाद सभेनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले गेले आहेत. त्यातच आता दोन अजामीनपात्र वॉरंट निघाले असून त्यांना अटक होणार का अशी चर्चा आहे. भोंग्याच्या वादावरुन अडकेलेले राज ठाकरे आता कायद्याच्या कचट्यातही सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. औरंगाबादच्या सभेनंतर आतापर्यंत राज ठाकरे यांच्या दोन अटक वॉरंट निघाले आहेत. पहिले वॉरंट सांगलीतील शिराळा न्यायालयाने तर दुसरं वॉरंट परळी न्यायालयाने काढले आहेत. परप्रांतीयांवर हल्ले आणि एसटीवर केलेल्या हल्ल्यामुळे त्यांच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि चिथावणीखोर वक्तव्यांबाबत गुन्हा दाखल केले गेले आहेत. त्यांच्यावर न्यायालयात वेळेवर हजर राहिले नसल्यामुळेही त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आले आहे. न्यायालयात सतत गैरहजर उपस्थित राहिल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार का हे आता येणारा काळच ठरणार आहे.

Published on: May 06, 2022 09:26 PM