Avinash Jadhav : मला गोपनीय खात्यात लपवलं, अतिशय वाईट… आंदोलनापूर्वी मध्यरात्री जे घडलं ते सारं अविनाश जाधवांनी सांगितलं

Avinash Jadhav : मला गोपनीय खात्यात लपवलं, अतिशय वाईट… आंदोलनापूर्वी मध्यरात्री जे घडलं ते सारं अविनाश जाधवांनी सांगितलं

| Updated on: Jul 08, 2025 | 2:28 PM

अशाप्रकारचे ज्यावेळी मोर्चे निघतात त्यावेळी आमची जबाबदारी असते की कोणतंही गैरकृत्य किंवा गालबोट लागू नये. पण ज्यावेळी हा मोर्चा चिघळाला त्यातील कोणी एकाने हे कृत्य केलं. त्याला दुजोरा नाही, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी मोर्चात घडलेल्या प्रकारावर दिली.

मीरा-भाईंदरमधील मनसेच्या मोर्चात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र यावेळी त्यांच्या अंगावर मोर्चातील एका जमावाकडून बाटली भिरकवण्यात आली. इतकंच नाहीतर यावेळी काही आंदोलकांनी ‘सरनाईक गो बॅक’ अशा घोषणाबाजी केली आणि सरनाईक यांनी त्या मोर्चातून काढता पाय घेतला. दरम्यान यासगळ्या प्रकारावर मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी भाष्य करत जर असं काही घडलं असेल तर एक मोर्चाचे आयोजक म्हणून मला ते आवडणार नाही ते चुकीचं असल्याचे म्हटलंय.

पुढे ते असेही म्हणाले, सकाळी दहा वाजता हा जर मोर्चा नीट काढू दिला असता तर साडे ११ पर्यंत हा मोर्चा संपला असता. पण पोलिसांनी मध्यरात्री ज्याप्रकारे जोर जबरदस्ती केली. रात्री तीन वाजता माझ्या घरी आले माझ्या कुटुंबाला उठवलं. मला मीरा भाईंदर इथे घेऊन आले तिथून डायरेक्ट मला पालघरला नेलं, त्यांच्या मनात नेमकी भिती कसली होती? असा सवाल अविनाश जाधव यांनी केला.

Published on: Jul 08, 2025 02:28 PM