Bharat Bandh : उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; ‘या’ सेवांवर होणार परिणाम
देशातील AITUC, HMS, CITU, INTUC, INUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC या कामगार संघटनांनी बंद पुकारला आहे. कोणत्या सेवांवर होणार परिणाम? जाणून घ्या
देशातील प्रमुख कामगार संघटनांकडून उद्या म्हणजेच ९ जुलै २०२५ रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. देशातील प्रमुख कामगार संघटनांकडून केंद्र सरकारच्या खासगीकरण आणि कामगार कायद्यांचा विरोध करण्यात आला आहे. देशातील दहा प्रमुख संघटनांकडून भारत बंदची घोषणा करण्यात आली असून उद्याच्या भारत बंद मध्ये तब्बल २५ कोटी कामगार सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्या भारत बंदमुळे देशातील प्रमुख सेवांवर परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे.
या सेवांवर होणार परिणाम
बँकिंग सेवा
विमा कंपन्यांचे काम
पोस्ट ऑफिस
कोळसा खाणींचे काम
राज्य वाहतूक सेवा
महामार्ग, बांधकाम
कंपन्यांचे उत्पादन
Published on: Jul 08, 2025 07:32 PM
