Suresh Dhas Video : ‘कराड अन् त्याच्या टोळीच्या हैदोसामुळं 500 व्यापाऱ्यांनी परळी, घरदार…’; सुरेश धसांचा गंभीर आरोप काय?
आका आणि त्याच्या टोळीच्या दहशतीमुळे पाचशे व्यापारी परळी सोडून गेल्याचा गंभीर आरोप भाजप नेते सुरेश धस यांनी केलाय.
वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीच्या हैदोसामुळे जवळपास पाचशे व्यापाऱ्यांनी घरदार सोडल्याचा गंभीर दावा भाजपच्या सुरेश धस यांनी केलाय. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीत एका व्यापाऱ्याच्या अपहरणाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर विविध व्यवसायाच्या एजन्सींवर फक्त कराड आणि त्यांच्या टोळीच वर्चस्व असल्याचा आरोप झाला. दहशतीमुळेच कोरोमंडळ नावाची सिमेंट कंपनी राज्याबाहेर गेल्याच्या आरोपानंतर धस यांनी नवा दावा केलाय. दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांबद्दल अंजली दमाणी यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध यंत्रणांना पत्र लिहून राजीनाम्याची मागणी केली. यावर खुद्द अजित पवार यांच्याच पक्षातील आमदार मुंडे यांचा राजीनामा मागत असल्याचं धस म्हणतायत. तर दुसरीकडे एका बाजूला करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश कोर्टान धनंजय मुंडेंना दिल्यानंतर त्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी धनंजय मुंडेंच्या समर्थनात भूमिका मांडली होती. पोटगीचे आदेश फक्त पत्नीलाच नव्हे तर इतर विविध नातेवाईकांना दिले जाऊ शकतात असं सदावर्ते यांचं म्हणणं होतं. मात्र या आधी धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मांना पत्नी म्हटलं होतं असं वक्तव्य अजित पवार गटाचेच प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
