BMC निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लान ठरला, पुढील 3 महिने… मुख्यमंत्र्यांचे निर्देश काय?

BMC निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लान ठरला, पुढील 3 महिने… मुख्यमंत्र्यांचे निर्देश काय?

| Updated on: Jul 21, 2025 | 5:40 PM

भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनिती आखली असून त्यानुसार तयारी सुरू केली आहे, ज्यात स्थानिक समस्या सोडवणे, महायुतीमधील समन्वय राखणे आणि स्वबळावर लढण्याच्या पर्यायाचा विचार करणे हे प्रमुख घटक आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने एक ‘मास्टर प्लान’ तयार केला आहे. या मास्टर प्लाननुसार, जनतेच्या समस्या सोडवण्यावर भाजपचा पुढील तीन महिने भर असणार आहे. पुढील तीन महिने मुंबईतील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावत ही निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती आखली आहे. मुंबई महापालिका जिंकणं ही सर्व आमदारांची जबाबदारी असेल. भाजपचा आमदार हा प्रत्येक वॉर्डातील समस्या जाणून घेणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील (भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट) आमदारांना समन्वय राखण्याचे आणि आपापसात वाद टाळण्याचे स्पष्ट निर्देश आमदारांना दिले आहेत. महायुतीमध्ये कोणताही वाद नको, समन्वय राखा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिल्या आहेत.

Published on: Jul 21, 2025 05:40 PM