Chhagan Bhujbal : आत्ताचं माहीत नाही, पण मी होतो तेव्हा.., गोगवलेंच्या विधानावर भुजबळांची प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal : आत्ताचं माहीत नाही, पण मी होतो तेव्हा.., गोगवलेंच्या विधानावर भुजबळांची प्रतिक्रिया

| Updated on: Jun 15, 2025 | 1:25 PM

Chhagan Bhujbal Statement : मंत्री भरत गोगवले यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर केलेल्या वक्तव्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी शिवसेनेत होतो तेव्हा बाळासाहेब निर्णय घ्यायचे, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हंटलं आहे. मंत्री भरत गोगवले यांनी ठाकरेंसंदर्भात केलेल्या दाव्यानंतर भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली आहे. शिवसेना सोडल्यानंतर पुन्हा जाण्याचा काही प्रश्न नव्हता, असं देखील मंत्री भुजबळ यावेळी म्हणालेत.

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मला काही कल्पना नाही, मला शिवसेना सोडून 35 वर्ष झाले आहेत. शिवसेनेत आता कोण निर्णय घेतं ते मी कसं सांगणार? पण मी शिवसेनेत होतो, तेव्हा बाळासाहेब ठाकरे निर्णय घ्यायचे. शिवसेना सोडल्यानंतर पुन्हा शिवसेनेत जाण्याचा काही प्रश्नच नाही. तसा काही मुद्दाच नव्हता. त्यामुळे मी तसा काही प्रयत्न देखील केला नाही, असं स्पष्ट शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री गोगवले यांच्या विधानावर बोलताना म्हंटलं आहे.

Published on: Jun 15, 2025 01:25 PM