VIDEO : Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, मंत्री छगन भुजबळांनी व्यक्त केला निर्धार

| Updated on: Nov 28, 2021 | 3:49 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणना करण्याचा मुद्दा लावून धरला आहे. जनावरांची गणना होते. मग आम्हाला ही मोजा, अशी मागणी करतानाच केंद्र सरकारमुळेच ओबीसींचं आरक्षण रद्द झाल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.

Follow us on

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणना करण्याचा मुद्दा लावून धरला आहे. जनावरांची गणना होते. मग आम्हाला ही मोजा, अशी मागणी करतानाच केंद्र सरकारमुळेच ओबीसींचं आरक्षण रद्द झाल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. पुण्यात महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी छगन भुजबळ बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, ओबीसी जनगणना झालीच पाहिजे. जनावरांची गणना होते. इथे आम्हाला मोजा. हात वर करुन इथं ठराव करा, ओबीसी जनगणना झालीच पाहिजे, असं असं भुजबळ म्हणाले.