Dharashiv News : अजित पवारांचे बॅनर फाडले; धाराशिवमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

Dharashiv News : अजित पवारांचे बॅनर फाडले; धाराशिवमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

| Updated on: Jul 21, 2025 | 12:15 PM

लातूर मारहाण प्रकरणी धाराशिवमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत.

धाराशिवमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. नांदेडमध्ये निषेध नोंदवल्यानंतर आता धाराशिवमध्ये देखील कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानमंडळात पत्ते खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या कृत्याच्या निषेधार्थ छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लातूरमध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते उधळले, ज्यामुळे जोरदार हाणामारी झाली. या घटनेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली. त्यामुळे आता छावा संघटनेसह इतर पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी ठीक ठिकाणी लावण्यात आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बॅनर देखील आंदोलकांनी फाडले आहेत. या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Published on: Jul 21, 2025 12:15 PM