राऊत यांचा प्रश्न येताच बावनकुळे यांनी थेट नितेश राणे याचं नाव घेत केलं सुटक वक्तव्य; म्हणाले, ‘त्यांना…’

| Updated on: Jun 13, 2023 | 9:39 AM

संजय राऊत यांना संधी मिळाली की ते शिंदे आणि शिंदे गटावर मिंधे गट अशा अशा खोचक शब्दांमध्ये टीका करतात. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना कालच्या वारकरी लाठीचार्ज घटनेसाठी माफी मागावी लागेल.

Follow us on

आळंदी : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. त्यांना संधी मिळाली की ते शिंदे आणि शिंदे गटावर मिंधे गट अशा अशा खोचक शब्दांमध्ये टीका करतात. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना कालच्या वारकरी लाठीचार्ज घटनेसाठी माफी मागावी लागेल. आता मुख्यमंत्री कुठे, हिंदुत्ववादी म्हणून मिरवणारे कुठे गप्प बसले आहेत. वारकऱ्यांची माफी मागितल्या शिवाय मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरला पूजेला जाऊ नये, असा आरोप त्यांनी होता. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारलं असता त्यांनी दोनच शब्दात राऊत यांचा विषय संपवला. तसेच ते म्हणाले. त्यांच्या या आवाहानावर नितेश राणे बोलले असतील.