VIDEO : Chitra Wagh Exclusive | मी काय आहे तुमच्या बापाला विचारा, चित्रा वाघ यांचं मेहबूब शेख यांना आव्हान
राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर काल नगरमध्ये बोचरी टीका केली होती. ‘लाचखोर नवऱ्याची बायको’, असा चित्रा वाघ यांचा उल्लेख आपल्या भाषणात शेख यांनी केला होता. याच टीकेला आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर काल नगरमध्ये बोचरी टीका केली होती. ‘लाचखोर नवऱ्याची बायको’, असा चित्रा वाघ यांचा उल्लेख आपल्या भाषणात शेख यांनी केला होता. याच टीकेला आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मी वाघ आहे वाघ…, माझ्यावर कोल्हे कुत्रे भुंकत आहेत. पण मी कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही”, अशा शब्दात त्यांनी महेबूब शेख यांच्यावर पलटवार केला आहे. “सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करुन झाले…. आता माझ्या परिवाराची बदनामी सुरु आहे. पण मी अ्सल्या प्रकाराला घाबरत नाही. मी काय आहे….काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या”, असं उघड आव्हानच त्यांनी शेख यांना दिलं आहे.
