‘भाजप कधीच शेतकऱ्यांचा पक्ष नव्हता ते फक्त शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारे सरकार’

| Updated on: Nov 24, 2021 | 10:00 PM

जोपर्यंत संसदेत तीन काळे कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा फुलप्रुफ कायदा सरकार आणत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना खरा न्याय मिळणार नाही’, असं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलंय. 

Follow us on

YouTube video player

मुंबई : ‘केंद्रातील भाजपाच्या सरकारने अन्नदाता शेतकऱ्यांची मोठी हालअपेष्टा केली. सत्तेत येण्यापूर्वी मोठी आश्वासने दिली पण सत्तेत येताच भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले. तीन काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्यांना संपवण्याचे षडयंत्र आखले होते. त्याला विरोध करत शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले शेवटी कायदे मागे घेत असल्याची घोषणा सरकारला करावी लागली. पण या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही म्हणून जोपर्यंत संसदेत तीन काळे कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा फुलप्रुफ कायदा सरकार आणत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना खरा न्याय मिळणार नाही’, असं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलंय.