COVID-19 cases in India: भारतात पुन्हा कोरोनाचा फैलाव, देशात 257 रूग्ण तर मुंबईचा आकडा ऐकून भरेल धडकी
हाँगकाँग आणि सिंगापूरसह आशियातील काही भागांमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा संसर्ग दिसून आलाय. आरोग्य अधिकारी अनेक राज्यांमध्ये कोविड-१९ प्रकरणांच्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत कारण सिंगापूर-हाँगकाँगनंतर आता भारतातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
हाँगकाँग आणि सिंगापूरसह आशियातील अनेक भागांनंतर, भारतातील अनेक शहरांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला असून कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीची पावले उचलली जात आहेत. सध्या भारतात फक्त मुंबई, चेन्नई आणि अहमदाबाद सारख्या शहरांमध्ये कोरोनाची रूग्ण आढळून आली आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रूग्णांची संख्या २५७ वर पोहोचली आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून केंद्राकडून कोरोना अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशासह मुंबईतील कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या रूग्णांची संख्या देखील समोर आली आहे. मुंबईत कोरोनाचे एकूण ५६ रूग्ण असल्याची माहिती आहे.
Published on: May 21, 2025 03:12 PM
