Shinde – Shah Meeting : एकनाथ शिंदे – अमित शाहांची तासभर बंद दाराआड चर्चा
Union Home Minister Amit Shah Maharashtra Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज सह्याद्री अतिथी गृहावर चर्चा झाली. तासभर झालेल्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात तासाभर सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा झाली आहे. वित्त विभागाच्या निधी वाटपासरंदर्भात ही चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, अमित शाह यांच्या एकनाथ शिंदे यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कालपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा केली. निधी वाटपासंदर्भात ही चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर राज्यातल्या विकासकामांसंदर्भात देखील ही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
Published on: Apr 13, 2025 01:41 PM
