Special Report | देवेंद्र फडणवीसांचं चॅलेंज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विरोधकांना चिमटे!

| Updated on: Jun 26, 2021 | 8:53 PM

सूत्र हाती द्या, त्यानंतर अवघ्या 4 महिन्यात आरक्षणाचा प्रश्न निकाली काढतो, असं चँलेंज देवेंद्र फडणवीस यांनी सरकारलं दिलं आहे.

Follow us on

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Reservation) मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. पुणे,मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या नेत्यांना ताब्यात घेतलं तसंच कार्यकर्त्यांचीही धरपकड केली.

नागपुरात फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज आंदोलन झालं. यावेळी फडणवीसांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेल्याची घणाघाती टीका फडणवीस यांनी केली तसेच, आपल्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, पदोन्नतीतील आरक्षण घालवलं, असा आरोप त्यांनी केला. सरकारला येणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्यायच्यात, असा आरोपही त्यांनी केली. आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

दरम्यान, सूत्र हाती द्या, त्यानंतर अवघ्या 4 महिन्यात आरक्षणाचा प्रश्न निकाली काढतो, असं चँलेंज देवेंद्र फडणवीस यांनी सरकारलं दिलं आहे.