Akkalkot : गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये उसळला भक्तांचा महासागर

Akkalkot : गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये उसळला भक्तांचा महासागर

| Updated on: Jul 10, 2025 | 8:56 AM

Guru Purnima : अक्कलकोट येथे गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाथी भाविकांनी गर्दी केली आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त आज अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. कालपासूनच भाविक भक्त अक्कलकोटमध्ये येण्यास सुरुवात झाली होती. गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरातून आणि परराज्यातून देखील भाविक मोठ्या संख्येने अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे दर्शन रांगेत लांबचलांब गर्दी बघायला मिळत आहे.

गुरुपौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी अक्कलकोट शहरात स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. गुरुपौर्णिमा हा गुरुंप्रती भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष दिवस असून, अक्कलकोटमध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. स्वामी समर्थांचे प्रमुख स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहरातील त्यांच्या भव्य मंदिरात भाविकांची गर्दी उसळली आहे. या निमित्ताने मंदिरात विशेष पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्त स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद प्राप्त करत असून, गुरु-शिष्य परंपरेचे पालन करत आहेत. यंदा गुरुपौर्णिमा गुरुवारी, 10 जुलै रोजी असल्याने भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान समितीने विशेष व्यवस्था केली असून, मंदिर 24 तास खुले ठेवण्यात आले आहे.

Published on: Jul 10, 2025 08:56 AM