Dhananjay Munde : राजीनाम्याला 5 महिने, मुंबईत स्वतःचं घर तरीही मुंडे सरकारी बंगला सोडेनात, कारण तरी काय?

Dhananjay Munde : राजीनाम्याला 5 महिने, मुंबईत स्वतःचं घर तरीही मुंडे सरकारी बंगला सोडेनात, कारण तरी काय?

| Updated on: Aug 14, 2025 | 12:25 PM

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याला पाच महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी देखील त्यांनी शासकीय निवासस्थान सोडलेलं नाही. तर मुंबईमध्ये दुसरं घर अगदी भाड्यानेही मिळत नसल्याचं धनंजय मुंडे म्हणतात. मुंडेंच्या या म्हणण्यावर अंजीली दमानिया आणि करुणा मुंडे यांनी आक्षेप नोंदवलाय.

मंत्रीपद जाऊन जवळपास साडेपाच महिने झाल्यानंतर सुद्धा धनंजय मुंडेनी सातपुडा हा सरकारी बंगला सोडलेला नाही. मुंडेंच्या जागी मंत्री झालेल्या छगन भुजबळांना सरकारी घर मिळत नाहीये. याबद्दल भुजबळांनी नाराजीही बोलून दाखवली तरीही धनंजय मुंडेनी बंगल्याचा ताबा अजूनही सोडलेला नाही. दरम्यान, मुंबईत आपले कुठेही घर नसल्याने आणि उपचार सुरू असल्याचे मुंडेंनी स्पष्टीकरण दिलंय. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात मुंबईत गिरगाव चौपाटीवर स्वतःचा फ्लॅट असल्याचा उल्लेख केलाय.

गिरगाव चौपाटीजवळ एस.एन.पाटकर मार्गावरच्या वीरभवन या 22 मजली इमारतीत नवव्या मजल्यावर 902 क्रमांकाचा फ्लॅट हा धनंजय मुंडे यांचा असल्याचा निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे. डिसेंबर 2023 मध्ये धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या नावावे 16 कोटी 50 लाख रुपयांना हा प्लाट खरेदी करण्यात आला होता. हा 4 बीएचके फ्लॅट 2 हजार 151 चौरस फुटांचा आहे. स्वतःच्या मालकीच्या या फ्लॅटचा निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख असताना सुद्धा मुंडे मुंबईत घर नाही असं का म्हणतायत? असा सवाल अंजीली दमानिया यांनी विचारलाय. तर करूणा शर्मा धनंजय मुंडे खोटं बोलत असल्याचा दावा केलाय.

Published on: Aug 14, 2025 12:25 PM