Nashik मधील गंगापूर धरणातून विसर्ग सुरु, सतर्कतेचा इशारा, गोदाघाटात पूर परिस्थिती

| Updated on: Sep 22, 2021 | 9:55 PM

नाशिककडे सुरुवातीला पाठ फिरवणाऱ्या पावसाने दुसऱ्या टप्प्यात जोरदार बॅटींग सुरू केली आहे. त्यामुळे नांदगाव, साकुरी या गावामध्ये दोनदा पूर आला आहे. यापूर्वी गोदावरीला एक पूर येऊन गेला आहे. सध्याही गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची हजेरी सुरू आहे.

Follow us on

YouTube video player

नाशिक : सध्या गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्प्याने वाढविण्यात येत आहे. आज बुधवारी (22 सप्टेंबर) दुपारी एक वाजता हा विसर्ग 6000 क्युसेक्स केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. दुपारी तीनपासून हा विसर्ग वाढवण्यात आला असून, तो 8 हजार क्युसेकपर्यंत नेण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीला वर्षातला दुसरा पूर आला आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचे पाणी गेले आहे. रामसेतू पुलाच्या जवळ पाणी पोहचले आहे. नदीकाठची सर्व मंदिरे पाण्याखाली बुडाली आहेत. नागरिकांनी नदीत पोहायला जावू नये, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत. नाशिककडे सुरुवातीला पाठ फिरवणाऱ्या पावसाने दुसऱ्या टप्प्यात जोरदार बॅटींग सुरू केली आहे. त्यामुळे नांदगाव, साकुरी या गावामध्ये दोनदा पूर आला आहे. यापूर्वी गोदावरीला एक पूर येऊन गेला आहे. सध्याही गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची हजेरी सुरू आहे.