कुरुलकरवर एटीएसची आणखी पकड मजबूत; आली महत्वाची अपडेट समोर, आता काय माहिती आली समोर

| Updated on: May 18, 2023 | 9:49 AM

तर कुरुलकर प्रकरणात आतापर्यंत बेंगळुरू येथील हवाई दलाच्या अधिकाऱ्यासह एकूण आठ जणांचे जबाब एटीएसने नोंदवले आहेत.

Follow us on

मुंबई : ‘डीआरडीओ’चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यासह भारतीय हवाई दलातील निखिल शेंडे हा अधिकारीदेखील हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे समोर आले आहे. या दोघांना पाकिस्ताननं हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचे तर पाक गुप्तचर संस्थेने महत्वाची माहिती घेतल्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी कुरुलकर आणि शेंडे यांची सध्या चौकशी सुरू आहे. तर या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले आहेत. राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. नाशिकमधील दोन मोबाइल क्रमांक सापडले असून, संशयित मोबाइल क्रमांकांची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे. तर कुरुलकर प्रकरणात आतापर्यंत बेंगळुरू येथील हवाई दलाच्या अधिकाऱ्यासह एकूण आठ जणांचे जबाब एटीएसने नोंदवले आहेत. व्हॉट्सॲप चॅटच्या डेटामधील दोन संशयित महिलांच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले आहेत. कुरुलकर यांच्या कार्यालयातील तीन अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीचादेखील जबाब नोंदविण्यात आला आहे.