Deepak Kesarkar | ड्रग्ज देशातून हद्दपार झाले पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका : दीपक केसरकर

Deepak Kesarkar | ड्रग्ज देशातून हद्दपार झाले पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका : दीपक केसरकर

| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 3:16 PM

देशातून ड्रग्ज हद्दपार करणं ही सेनेची भूमिका असल्याचं माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. 50 ग्रॅम 100 ग्रॅम ड्रग्ज पकडायचे आणि सेलिब्रिटींच्या छोट्या-मोठ्या मुलांना उभं करायचं आणि त्यांना या प्रकरणात अडकावयचं, असं सुरु आहे.

देशातून ड्रग्ज हद्दपार करणं ही सेनेची भूमिका असल्याचं माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. 50 ग्रॅम 100 ग्रॅम ड्रग्ज पकडायचे आणि सेलिब्रिटींच्या छोट्या-मोठ्या मुलांना उभं करायचं आणि त्यांना या प्रकरणात अडकावयचं, असं सुरु आहे. त्यानंतर ते जामीनावर सुटतात, पुढं काहीचं होत नाही. ड्रग्ज या देशातून हद्दपार झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. यासाठी गुजरात वरून येणारं ड्रग्स रॅकेट आधी उध्वस्त करा, असं दीपक केसरकर म्हणाले.

एका अधिकाऱ्यावरुन सेनेवर प्रश्नचिन्ह नको

एका मराठी अधिकाऱ्यावरून शिवसेनेची भूमिका मराठी माणसाविरोधात आहे, अशी कोणी टीका करू नये. आम्हाला त्या मराठी अधिका-याबद्दल आदर आहे. त्या अधिकाऱ्याने आपलं कर्तव्य पार पाडावे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. मात्र, उगाचच एका व्यक्ती वरून शिवसेनेच्या मराठी भूमिका विषयी कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये, असा सणसणीत टोला माजी गृह राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी भाजपला लगावला आहे.