Dino Morea ED Raid : मिठी नदी गाळ उपसा घोटाळा; डिनो मारियो ईडीच्या फेऱ्यात कसा अडकला?

Dino Morea ED Raid : मिठी नदी गाळ उपसा घोटाळा; डिनो मारियो ईडीच्या फेऱ्यात कसा अडकला?

| Updated on: Jun 06, 2025 | 3:59 PM

ED Raid : मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाच्या घरी आज ईडीची छापेमारी करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अभिनेता डिनो मोरिया याच्या घरी मुंबईत ईडीचे छापे पडले आहेत. मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी झालेल्या घोटाळ्यात ईडीने आज ही कारवाई केली आहे. तब्बल साडेआठ तास ही छापेमारी सुरू होती. वरळीत केतन कदम आणि कांदिवलीमध्ये जय जोशी यांच्या घरी देखील ईडीने कारवाई केली आहे. या छापेमारीत ईडीला कोणते पुरावे मिळतात हे पाहणं महत्वाचं असेल.

मात्र या संपूर्ण प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया कसा अडकला हे देखील महत्वाचं आहे. याच प्रकरणात केतन कदम हा अटकेत आहे. तोच या प्रकरणातला कथित मुख्य आरोपी आहे. अभिनेता डिनो मोरिया हा केतन कदम याला 2 दशकांपासून ओळखतो. डिनोचा भाऊ सँटीनो मोरिया आणि केतनची पत्नी युबो राईड्स कंपनीत संचालक आहेत. ही आधी फूड कंपनी होती. नंतर या कंपनीने गेट वे जवळ चालणाऱ्या बग्गीचे काम घेतले. केतन कदम याने अभिनेता डिनो मोरियाच्या खासगी बँक खात्यात 14 लाखांहून अधिक पैसे पाठवले असल्याचं तपासात समोर आलं आहे. यानंतर अभिनेता डिनो मोरिया याने काही पैसे युबो राईड्स कंपनीच्या खात्यात वळवले. हे पैसे आर्थिक अपहार करून डिनो मारियोला पाठवण्यात आल्याचा संशय ईओडब्ल्युला आहे. याच आधारावर अभिनेता डिनो मोरिया याची चौकशी सुरू आहे.

Published on: Jun 06, 2025 03:56 PM