Eknath Shinde Birthday Video : ‘मला तुम्ही फार आवडता अन्…’, आशा भोसलेंकडून एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या स्पेशल शुभेच्छा
शिंदेंच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या समर्थकांनी शहरभर जोरदार बॅनरबाजी करत वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच मुंबईत मातोश्रीच्या अंगणात एकनाथ शिंदे यांचे मेहनती, प्रामाणिक आणि निडर या अशयाचे बॅनर लावण्यात आले असून उद्धव ठाकरेंना टोला लगावण्यात आलाय
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा आज राज्यभरात ६१ वा वाढदिवस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडून साजरा केला जात आहे. शिंदेंच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या समर्थकांनी शहरभर जोरदार बॅनरबाजी करत वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच मुंबईत मातोश्रीच्या अंगणात एकनाथ शिंदे यांचे मेहनती, प्रामाणिक आणि निडर या अशयाचे बॅनर लावण्यात आले असून उद्धव ठाकरेंना टोला लगावण्यात आलाय. तर बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड एकनाथ शिंदे कधीच करणार नाही असाही उल्लेख बॅनरवर आहे. ठाणे, मुंबई नवी मुंबई , पुणे आणि इतर शहरभर एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर झळकत आहेत. काहींवर ‘आमचं दैवत’, डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन असा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय, शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाणे शहरात आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरभर बॅनरबाजी अन् कार्यक्रमांची जंत्री दिसून येत आहे. या माध्यमातून शिवसेना एकप्रकारचे शक्ती प्रदर्शन करत असल्याची चर्चा आहे दुसरीकडे प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी गाणं गाऊन एकनाथ शिंदे यांना सुरेल वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी आशा भोसले यांनी एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमने उधळली.
