VIDEO : Fast News | 1 PM | महत्वाच्या बातम्या | 5 April 2022

VIDEO : Fast News | 1 PM | महत्वाच्या बातम्या | 5 April 2022

| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 2:27 PM

कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीत मतदारांना पेटीएमद्वारे एक हजार रुपये देण्यात येत आहे. मतदारांनी हा पैसा घेऊ नये. पैसे वाटप करणाऱ्यांविरोधात आम्ही ईडीकडे तक्रार करणार आहोत. त्यामुळे मतदारांनी पैसे घेऊ नये. नाही तर उगाच अडचणीत याल, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. पाटील यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीत मतदारांना पेटीएमद्वारे एक हजार रुपये देण्यात येत आहे. मतदारांनी हा पैसा घेऊ नये. पैसे वाटप करणाऱ्यांविरोधात आम्ही ईडीकडे तक्रार करणार आहोत. त्यामुळे मतदारांनी पैसे घेऊ नये. नाही तर उगाच अडचणीत याल, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. पाटील यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. भोंगे लावण्याचं चंद्रकांत पाटलांना कळलं. भाजप आपल्या खर्चानं करताहेत. आता तिथेही ईडी लावतील. जशी कोल्हापूरच्या मतदारांच्या मागे लावली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जपून पैसे खर्च करा. तुम्ही भाजीची जुडी जरी विकत घ्यायला गेला तरी, तुमच्यावर भाजपचं लक्ष आहे. तुम्ही चिकनच्या रांगेत गेला तरी किती किलो चिकन घेतलं? किती घेतलं? आज किती घेतलं? यावर भाजपचं लक्ष आहे.