Video : अरे तुला काय तुझं घर नाही का बाबा? अजित दादांनी घेतला राणा दाम्पत्याचा समाचार

Video : अरे तुला काय तुझं घर नाही का बाबा? अजित दादांनी घेतला राणा दाम्पत्याचा समाचार

| Edited By: | Updated on: Apr 26, 2022 | 1:55 PM

शिवसेनेविरुद्ध आक्रमक आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री आणि शिवसेनाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा आग्रह धरला होता. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भाष्य केलंय.

मुंबई : शिवसेनेविरुद्ध (Shivsenaआक्रमक आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मातोश्री आणि शिवसेनाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर शिवसेनाही त्यांच्याविरोधात चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आले. शिवसेनेकडूनही राणा कुटुंबियांच्या घरावर आक्रमक आंदोलन करण्यात आले. याच दरम्यान राणा कुटुंबियांनी राज्याचा आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान केला आसल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली होती. दरम्यान, यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: Apr 26, 2022 01:54 PM