तुम्ही गिर्यारोहनासाठी जात असाल तर हा व्हिडीओ बघाच, असंख्य मधमाश्यांचा गिर्यारोहकांवर हल्ला, नेमकं काय झालं?
पुणे जिल्ह्यातील इंदापूरवरून सातारा जिल्ह्यातील वाईच्या पांडवगडावर फिरण्यासाठी आलेल्या गिर्यारोहकांवर सकाळच्या सुमारास मधमाशांचा हल्ला झाला.
सातारा जिल्ह्यातील वाईच्या पांडवगडावर फिरण्यासाठी गेलेल्या 6 गिर्यारोहकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मधमाशांनी केलेल्या या हल्ल्यात 4 गिर्यारोहक किरकोळ जखमी झाले आहे तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मुळतेय. तर जखमी गिर्यारोहकांचे बचाव कार्य सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूरवरून सातारा जिल्ह्यातील वाईच्या पांडवगडावर फिरण्यासाठी आलेल्या गिर्यारोहकांवर सकाळच्या सुमारास मधमाशांचा हल्ला झाला. गिर्यारोहकांनी लावलेल्या अत्तराच्या आणि परफ्यूमच्या वासाने पांडवगडावर असलेल्या मधमाशांचे पोळे विचलित झाले आणि यातूनच मधमाशांनी थेट गिर्यारोहकांवर हल्ला चढवला. यामध्ये सहा गिर्यारोहक गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची माहिती मिळतेय. तर त्यामध्ये दोन गिर्यारोहक बेशुद्ध पडले आहेत. गिर्यारोहक प्रशांत डोंगरे यांनी मदतीची हाक प्रशासनाला दिली आहे.
Published on: Feb 10, 2025 02:29 PM
