Buldana | कोरोनाच्या संसर्गपासून बचावाकरिता लहान मुलांसाठी स्वतंत्र्य वॉर्ड उभारणार: राजेंद्र शिंगणे
जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा कोरोना बाधित लहान मुलांसाठी स्वतंत्र वार्डची व्यवस्था करण्यात येणार आहे. (Independent ward for children to be set up to prevent corona infection, Rajendra Shingane)
बुलडाणा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होण्याची शक्यता सांगितले जात असल्याने त्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा कोरोना बाधित लहान मुलांसाठी स्वतंत्र वार्डची व्यवस्था करण्यात येणार आहे. म्युकरमायकोसीस रुग्णांसाठी देखील त्यांच्या ऑपरेशनसाठी स्वतंत्र ऑपरेशन थेटर तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
