India-Pakistan Conflict : भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली

India-Pakistan Conflict : भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली

| Updated on: May 04, 2025 | 5:28 PM

Chinab River : भारताने चिनाब नदीचे पाणी थांबवले आहे. बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारे पाणी थांबवण्यात आलेले आहे.

भारत – पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असतानाच भारताने पाकिस्तानच्या विरोधात आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. बगलिहार धरणातून भारताने चिनाब नदीचे पाणी थांबवले आहे. बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आलेला आहे. पाकिस्तानसोबत व्यापार बंदी देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता भारताकडून पाकिस्तानला एकापाठोपाठ एक धक्के दिले जात आहेत. याआधी देखील सिंधु पाणी करार स्थगितीचा निर्णय भारताने घेतला आहे. पाकिस्तानचं हवाई क्षेत्र बंद करण्याचाही कठोर निर्णय भारत सरकारकडून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली आहे.

Published on: May 04, 2025 05:28 PM