Colonel Sofia Qureshi : 400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; कर्नल कुरेशींनी रात्री घडलेल्या घटनेची दिली माहिती

Colonel Sofia Qureshi : 400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; कर्नल कुरेशींनी रात्री घडलेल्या घटनेची दिली माहिती

| Updated on: May 09, 2025 | 6:52 PM

indian army press conference : कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी ही पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानचा डाव उघडा पाडला आहे.

भारताने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करुन भारतीय हद्दीत प्रवेश केला आणि 400 ड्रोनचा वापर करुन 36 ठिकाणी हल्ला केला. पाकिस्तानने या हल्ल्यासाठी तुर्कीच्या ड्रोनचा वापर केला. पाकच्या या हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर दिलंय अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी आज परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.

पुढे बोलताना कर्नल कुरेशी म्हणाल्या की, पाकिस्तानने सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं आणि 400 ड्रोनच्या सहाय्याने 36 ठिकाणी हल्ले केले. त्यापैकी बहुतांश ड्रोन भारतीय सेनेने पाडलं. इतक्या मोठ्या ड्रोन हल्ल्याचा अर्थ असा होता की त्यांना भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेची ताकद जाणून घ्यायची होती. भारताने बहुतेक ड्रोन नष्ट केले आहेत. हे ड्रोन तुर्कीचे होते. उरी, पुंछ, राजौरी, उधमपूर यासह इतर ठिकाणी ड्रोन आणि गोळीबारी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याचे काही जवान जखमी झाले असल्याचं देखील कुरेशी यांनी सांगितलं.

Published on: May 09, 2025 06:51 PM