Jalgaon News : फूल टाईम पोलीस, पार्ट टाईम चोर; पोलीस उपनिरीक्षकानेच बनवली चोरांची टोळी

Jalgaon News : फूल टाईम पोलीस, पार्ट टाईम चोर; पोलीस उपनिरीक्षकानेच बनवली चोरांची टोळी

| Updated on: Apr 18, 2025 | 3:48 PM

जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे चोरी करून फरार होण्याच्या तयारीत असणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी पकडलं असून या टोळीचा म्होरक्या हा स्वत: जालना येथे पोलीस उपनिरीक्षक असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकावर एका शेतकऱ्याची ३५ हजार रुपयांची रोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या टोळीतील सदस्यांमध्ये एका सराईत गुन्हेगारासह जालना येथील पोलीस दलातील एका सहाय्यक उपनिरीक्षकाचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. प्रल्हाद मॉन्टे (५७) असे संशयिताचे नाव असून, तो राज्यभरातील बस स्थानकात चोरीची साखळी चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. चोपडा बस स्थानकात वाळकी येथील शेतकरी वसंत कोळी यांचे ३५ हजार रुपये चोरण्यात आले होते. चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसह चोपडा शहर पोलिसांनी मोटारीचा पाठलाग केला. त्यानंतर चोरांना पकडल्यावर हा सगळा प्रकार उघड झाला आहे.

Published on: Apr 18, 2025 03:48 PM