Lashkar-e-Taiba : लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
Jammu Kashmir Terrorist Arrested : जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा भागातून लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आलेला आहे.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा भागातून शस्त्रास्त्र, दारूगोळ्यासह चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांना पकडण्यात आलं आहे. अटक झाल्यावर या दहशतवाद्यांनी आपण लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचं असल्याचं कबूल केलं. बांदीपोरा भागातून मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्र, दारूगोळ्याचा साठा देखील जप्त करण्यात आलेला आहे. दोन चायनीज हँडग्रेनेड, एक 7.62 एमएम मॅग्झीन, 7.62 एमएमचे 30 राऊंड जप्त करण्यात आलेले आहेत. अटक केलेल्या चौघांपैकी 2 जणांची माहिती समोर आली आहे.
Published on: Apr 24, 2025 11:40 AM
