केंद्रातील सरकार चार महिन्यात बदलणार, ‘या’ नेत्याच्या दाव्यानं चर्चा
लोकनेते विलास काका पाटील उंडाळकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरण आणि कोयना बँकेच्या प्रशासकी कार्यालयाचे उद्घाटन जयंत पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी एक मोठा दावा केला. केंद्रातील भाजप सरकार चार महिन्यातच बदलणार असे ते म्हणाले.
केंद्रातील भाजप सरकार चार महिन्यातच बदलणार आहे. त्यानंतर दिल्ली सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण जातील, इंडिया आघाडीचा मी सदस्य आहे, म्हणून सांगतोय असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला. लोकनेते विलास काका पाटील उंडाळकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरण आणि कोयना बँकेच्या प्रशासकी कार्यालयाचे उद्घाटन जयंत पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. बँका चालवणं सोपं नाही मी उदयसिंह पाटील उ़डाळकरांना सांगेन स्पीडने जाऊ नका तुम्हाला मत मागायची गरज नाही. जोपर्यंत बाबावर दिल्लीत जात नाहीत तोपर्यंत तुम्हाला मत मागायची गरज नाही. केंद्रातील सरकार चार महिन्यात बदलणार आहे. दिल्लीतील सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण जातील पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे अनेक वर्षाचा कार्यकाळ दिल्लीत घालवला आहे. त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला महाराष्ट्राला होईल असेही ते म्हणाले.
