Karuna Sharma : त्यांना Welcome… करूणा शर्मांची दुसऱ्या बायकोचं नाव घेत मुंडेंना खुली ऑफर, म्हणाल्या खोट्याची गरज नाही…

Karuna Sharma : त्यांना Welcome… करूणा शर्मांची दुसऱ्या बायकोचं नाव घेत मुंडेंना खुली ऑफर, म्हणाल्या खोट्याची गरज नाही…

| Updated on: Aug 13, 2025 | 5:04 PM

सध्या धनंजय मुंडे यांनी बंगला कधी सोडणार यावर चर्चा सुरू आहे, मात्र या प्रकरणी राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत असताना करूणा शर्मांनी मोठं वक्तव्य केलंय.

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपद गेल्यांतरही अद्याप सातपुडा हा शासकीय बंगला सोडलेला नाही. यामुळे त्यांच्यावर आतापर्यंत 42 लाख रुपयांचा मोठा दंड लावण्यात आला आहे. असे असताना धनंजय मुंडे हा मोठा दंड कधी भरणार की भरणारच नाही? शासकीय बंगला कधी सोडणार? याकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या असताना याच पार्श्वभूमीवर करुणा शर्मा मुंडे यांनी एक मोठे विधान केले आहे. टीव्ही ९ मराठीशी बोलताना त्यांनी म्हटले की, धनंजय मुंडे यांचे मुंबईत पवई, मलबार हिल आणि सांताक्रूझ येथे तीन ते चार घरे आहेत. जर त्यांना राहण्यासाठी घर नसेल, तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत आपल्या घरी यावे, असे म्हणत करूणा शर्मांनी धनंजय मुंडे यांनी ही ऑफरच दिली. दरम्यान, करुणा शर्मा यांनी दिलेली ऑफर धनंजय मुंडे स्वीकारणार की नाही? हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तर करुणा शर्मा यांनी असेही म्हटले की, धनंजय मुंडे यांच्यासाठी 42 लाख रुपयांचा दंड काहीच नाही. तसेच, त्यांनी असा दावाही केला आहे की धनंजय मुंडे पुन्हा कधीही मंत्री होणार नाहीत आणि त्यांना आपले आमदारपदही गमवावे लागेल.

Published on: Aug 13, 2025 04:01 PM