Karuna Sharma News : धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा

Karuna Sharma News : धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा

| Updated on: Mar 15, 2025 | 5:35 PM

Karuna Sharma Statement On Dhananjay Munde : मंत्रिपद गेलं आता 6 महिन्यात धनंजय मुंडे यांची आमदारकीसुद्धा जाईल, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. आज परळी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

मंत्रिपदानंतर आता धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील जाणार असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. येत्या 6 महिन्यात धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. परळीच्या कोर्टात आज धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुनावणी होती. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात विधानसभेत शपथ पत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार दाखल केलेली आहे. त्यावर आज सुनावणी होती. या ठिकाणी कोर्टात हजर राहण्यापूर्वी करुणा शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळिल बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या की, धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचा राजीनामा देतील. त्यांनी राजीनामा दिला. आता येत्या 6 महिन्यात त्यांची आमदारकी देखील जाईल. एका वर्षाच्या आत परळीमध्ये पुन्हा निवडणूक होईल. विधानसभेच्या शपथ पत्रात त्यांनी खोटी माहिती दिली आहे. त्यामुळे 100 टक्के त्यांची आमदारकी जाणार, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे.

Published on: Mar 15, 2025 05:35 PM