Karuna Sharma : .. तेव्हा माझा मोठा विजय होईल, मुंडेंची याचिका फेटाळल्यावर करुणा शर्मांची प्रतिक्रिया
Karuna Sharma On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांची याचिका माजलगाव कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटगी द्यावीच लागणार आहे.
येत्या सहा महिन्यात धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होणार आणि तो माझा विजय असेल, असं विधान करुणा शर्मा यांनी केलं आहे. तर धनंजय मुंडे यांची याचिका माजगाव कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटगी द्यावीच लागणार आहे. यावेळी बोलताना करुणा शर्मा यांनी म्हंटलं की, हा माझा छोटा विजय आहे. पण माझा मोठा विजय तेव्हा होईल जेव्हा धनंजय मुंडे यांची आमदारकी पुढच्या सहा महिन्यात रद्द होईल. माझी याचिका तुम्ही बघवी. त्यात मी लिहिलं आहे की मी धनंजय मुंडे यांची पहिली बायको आहे. त्यासाठी मला पोटगी हवी आहे. तो माझा हक्क आहे, असंही करुणा शर्मा यांनी म्हंटलं आहे.
Published on: Apr 06, 2025 11:45 AM
