केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; विश्व हिंदू परिषदेनं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?

केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; विश्व हिंदू परिषदेनं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?

| Updated on: Jun 14, 2024 | 4:50 PM

वक्फ बोर्डला १० कोटी रुपयांच्या निधी देण्याच्या राज्य सरकराच्या निर्णयाचा विश्व हिंदू परिषदेकडून निषेध जोरदार निषेध करण्यात येत आहे. यावर विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोव्याचे मंत्री गोविंद शेंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. वक्फ बोर्डला दिलेला १० कोटींचा हा निधी त्वरित रद्द करण्यात यावा नाहीतर...

राज्य सरकारने वक्फ बोर्डला १० कोटी रुपयांच्या निधी दिली आहे. दरम्यान, वक्फ बोर्डला १० कोटी रुपयांच्या निधी देण्याच्या राज्य सरकराच्या निर्णयाचा विश्व हिंदू परिषदेकडून निषेध जोरदार निषेध करण्यात येत आहे. यावर विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोव्याचे मंत्री गोविंद शेंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “वक्फ बोर्डला दिलेला १० कोटींचा हा निधी त्वरित रद्द करण्यात यावा”, अशी मागणी व्हीएचपीचे मंत्री गोविंद शेंडे यांनी केली आहे. वक्फ बोर्डाने दिलेला निधी परत घेतला नाही तर विश्व हिॅदू परिषद रस्त्यावर उतरणार, असा इशाराही गोविंद शेंडे यांनी दिला आहे. तर केतकी चितळे यांच्या प्रमाणे लोकांनी याविरोधात आवाज उठवावा, असेही त्यांनी आपली आक्रमक भूमिका मांडताना म्हटले आहे. मंदिरांचा पैसा वक्फ बोर्डाला दिला जातोय मंदिरं सरकारी नियंत्रणात आणता, आणि तृष्टीकरणाच्या राजकारणासाठी वक्फ बोर्डाला निधी देता? असा सवाल करीत, सरकराची मजबुरी काय? असा प्रश्न गोविंद शेंडे यांनी उपस्थित केला आहे.

Published on: Jun 14, 2024 04:48 PM