Khawaja Asif : पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!

Khawaja Asif : पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!

| Updated on: May 11, 2025 | 4:32 PM

India - Pakistan Ceasefire : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ याने भारताकडून महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा म्हंटलं आहे.

भारतासोबत कोणत्याही प्रमुख मुद्यांवर चर्चा होऊ शकते असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ याने म्हंटलं आहे. काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव कमी झाला. तसंच दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनंतर आता उद्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील मुख्य डिजीएमओची उद्या महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत काय चर्चा होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर भारताशी सिंधु जल करार आणि काश्मीरच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा होण्याची आशा पाकिस्तानला आहे. त्यावर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ याने प्रतिक्रिया दिली आहे. या चर्चेत सिंधु जल करार आणि दहशतवाद प्रमुख मुद्दे असल्याचं ख्वाजा आसिफ यांनी म्हंटलं आहे. युद्धबंदीमुळे शांततेचा मार्ग निघत असेल तर स्वागत आहे, असं देखील ख्वाजा आसिफ यांनी म्हंटलं आहे.

Published on: May 11, 2025 04:32 PM