Kirit Somaiya : नवाब मलिकांचा राजीनामा का घेत नाही? किरीट सोमय्या यांचा सवाल

Kirit Somaiya : नवाब मलिकांचा राजीनामा का घेत नाही? किरीट सोमय्या यांचा सवाल

| Edited By: | Updated on: May 21, 2022 | 12:37 PM

Kirit Somaiya: नवाब मलिक म्हणजे दाऊद हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब या रस्त्यावर पवारांसोबत आणि न्यायालयाविरोधात काढा मोर्चा.

ठाणे: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी काय संबंध आहेत? असा सवाल कोर्टाने केला आहे. त्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आघाडी सरकारला घेरलं आहे. नवाब मलिकांचा राजीनामा का घेत नाही? दाऊदची धमकी आहे की शरद पवारांची?; असा सवाल सोमय्या यांनी केली आहे. साडेचार महिने झाले. शिवसेना नेते संजय राऊत रोज मनोरंजन करतात. आता राज्यातील जनता त्यांच्यावर हासत आहे. ऑडिटपासून जे काही ते बोलत आहेत, ते सर्व ऑनलाईन आहे. उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि राऊत हे इश्यू डायव्हर्ट करत आहेत. मलिक दाऊद संबंध बाहेर येणार हे माहीत होतं. म्हणून लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होता. दाऊदशी संबंध असल्याचं सिद्ध झाल्यानंतरही मलिकांना मंत्रिमंडळातून काढलं जात नाही. धमकी शरद पवारांची आहे की दाऊदची आहे? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना सोमय्या यांनी हा सवाल केला आहे.

Published on: May 21, 2022 12:37 PM