उत्तर महाराष्ट्रात भाजपाला इतका फटका कधी बसला नव्हता, एकनाथ खडसे यांचे खडेबोल
उत्तर महाराष्ट्रात केवळ दोनच जागा यावेळी भाजपाला मिळाल्या आहेत. त्यामुळे महायुतीला विधानसभेत तयारी करायची असेल तर सर्व त्रूटी दूर करायला हव्यात असे खडेबोल भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी सुनावत घरचा आहेर दिला आहे.
महायुतीला कमी जागा मिळताना दिसत असून महाविकास आघाडीला जादा जागा मिळाल्या आहेत. प्रथमच एवढ्या कमी फरकाने उमेदवार निवडून येत आहेत. पूर्वी लाखाच्या फरकाने उमेदवार विजयी होत आता एक 40 हजार किंवा त्याहूनही अत्यंत कमी फरकाने उमेदवार निवडून येत आहेत. इतक्या निवडणूका चुरशीच्या झाल्याचे भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील फोडाफोडीचं राजकारण जनतेला आवडलेले नाही. येथे एण्टी इकंबन्सीचा फटका बसणार असे मी सांगत होतो. शेतकरी नाराज आहे. शेतकऱ्यांना मालाला भाव नाही. भाजपाने चिंतन केले पाहीजे असे मी म्हटलं होतं. परंतू भाजपाच्या काही नेत्यांना माझं हे वक्तव्यं भोवले आहे. वस्तूस्थितीला धरुन मी हे स्टेटमेंट दिले होते. महायुतीला विधानसभेत यश मिळवायचं असेल तर चुकांतून शिकत त्या दुरुस्त करायला पाहीजे असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. निवडणूकीत चारशे पारची घोषणा कार्यकर्त्यांत जोश निर्माण होण्यासाठी द्याव्या लागतात असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रात केवळ दोनच जागा मिळाल्या असून त्याही जळगावातील असल्याचे खडसे यांनी सांगितले.
