VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 25 September 2021
पुणे शहर पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण लवकरच कमी होणार आहे. कारण सोमवारपासून महिला पोलिसांना केवळ आठ तासच काम करावे लागेल. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे शहर पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण लवकरच कमी होणार आहे. कारण सोमवारपासून महिला पोलिसांना केवळ आठ तासच काम करावे लागेल. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे शहर पोलीस दलातील हजारपेक्षा जास्त महिला कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी अमरावती आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांच्या कामाचे तासही कमी करण्यात आले होते. नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्युटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी इतर पोलिस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा, अशी सूचना केली होती.
