मी माफी मागतो, माझ्याकडून..; भास्कर जाधवांवर का आली सभागृहात वारंवार माफी मागण्याची वेळ?

मी माफी मागतो, माझ्याकडून..; भास्कर जाधवांवर का आली सभागृहात वारंवार माफी मागण्याची वेळ?

| Updated on: Jul 18, 2025 | 1:00 PM

विधीमंडळातील राड्याचे पडसाद सभागृहातही उमटले असून सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच भिडले आहेत.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये विधान भवनाच्या लॉबीत झालेल्या हाणामारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेचे पडसाद आज सभागृहातही उमटताना दिसून आले आहेत.  ज्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र राजकीय खडाजंगी सुरू झाली आहे.

दरम्यान, काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना शिवसेना (उबाठा) नेते भास्कर जाधव यांनी हातवाऱ्यांसह प्रतिक्रिया दिली. यावरून आज सत्ताधारी आमदारांनी जाधव यांना ताकीद देण्याची मागणी केली होती. याला उत्तर देताना जाधव यांनी घटनेबद्दल खेद व्यक्त केला आणि सभागृहाबाहेर घडलेल्या या प्रकाराबाबत सभापती जी शिक्षा देतील, ती स्वीकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले.

Published on: Jul 18, 2025 01:00 PM