Maharashtra 12th Result 2025 : यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल

Maharashtra 12th Result 2025 : यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल

| Updated on: May 05, 2025 | 12:11 PM

Maharashtra Board 12th Result Updates : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजेपासून हा निकाल लाईव्ह बघता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. यात यंदा राज्याचा निकाल 91.88 टक्के इतका लागला असल्याची माहिती तर राज्यातून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील कोकणच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारलेली बघायला मिळाली आहे. सर्वाधिक 96.74 टक्के मिळवत अव्वल स्थान कायम ठेवले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा वेबसाईटवर हा निकाल आज दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांच्या मनात धाकधूक काहीशी वाढलेली आहे.

Published on: May 05, 2025 12:11 PM