राज्यात 26 लाख 34 हजार लाडक्या बहिणींना फटका!
महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात अपात्र लाभार्थ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. राज्यात एकूण 26 लाख 34 हजार महिला या योजनेत अपात्र ठरल्या आहेत. पुणे, ठाणे, नाशिक, अहमदनगर आदी जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने अपात्र लाभार्थी आढळून आले आहेत. यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत गोंधळ निर्माण झाला आहे आणि सरकारी निधीचा गैरवापर झाल्याची शक्यता आहे.
राज्यात 26 लाख 34 हजार अपात्र लाडक्या बहिणी आहेत. यापैकी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात 2 लाख 4 हजार महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात 1 लाख 25 हजार अपात्र लाडक्या बहिणी आहेत. राधाकृष्ण विखे पाटलांच्या अहिल्यानगरात देखील 25 हजार 756 लाडक्या बहिणी अपात्र असून त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नाशिकमध्ये 1 लाख 86 हजार 800 महिला अपात्र ठरल्या आहेत. मंत्री संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 लाख 4 हजार 500 बहिणी अपात्र ठरल्या आहेत. नागपुरात 95 हजार 500 अपात्र लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतलेला आहे. बीड जिल्ह्यात देखील 71 हजार तर सोलापूरात 1 लाख 4 हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. साताऱ्यात 86 हजार, अमरावती मध्ये 61 हजार अपात्र लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतला आहे.
