Video : पुढील पाच दिवस ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

| Updated on: Mar 15, 2023 | 8:07 AM

Maharashtra Rain Update : राज्यभरात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह, पावसाच्या सरी आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. पाहा...

Follow us on

मुंबई : राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह, पावसाच्या सरी आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. हा अंदाज राज्यात पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.शनिवारपर्यंत कालावधीसाठी वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ासाठी हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यापासून प्रतिबंधासाठी तयारीत राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या पावसामुळे शेतीतील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.