Maharashtra Rain : मुसळधार पावसानं शेतीचं नुकसान, बळीराजाच्या अश्रूंचा फुटला बांध; राज्यात कुठं-कुठं दाणादाण?

Maharashtra Rain : मुसळधार पावसानं शेतीचं नुकसान, बळीराजाच्या अश्रूंचा फुटला बांध; राज्यात कुठं-कुठं दाणादाण?

| Updated on: May 29, 2025 | 8:13 AM

राज्यातल्या बहुतांश भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भाला पावसाने झोडपून काढलंय. मुसळधार पावसाने जालना, बुलढाण्यात शेतकर्‍यांच मोठ नुकसान झालंय.

यंदा लवकर धडकलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भातही दाणादाण उडवून दिली आहे. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी शिरल्याने लोकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. या पावसामुळे शेतीवर ही मोठा परिणाम झाला आहे. कुठे कांदा तर कुठे ऊस, डाळिंबाच्या पिकांची या पावसाने नासाडी केली आहे. जोरदार पडलेल्या पावसानं नुकसानीमुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यातून ही अश्रूंचा बाध फुटला आहे. तर काही ठिकाणी सकल भागात भरलेल्या पाण्यातन जीवघेणा प्रवास ही पाहायला मिळतोय.

पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या करंदी ओढावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे बाईकस्वारांनी या पाण्यातूनच प्रवास केला आहे. आंबेगाव तालुक्यातून वाहणाऱ्या घोड नदीला पहिल्याच पावसात पूर आला आहे. गेले पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा पाऊस झाला आहे. त्यामुळे घोड नदी दुथडी भरून वाहतेय. इंदापुरात पद्मावती देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यासह सभा मंडपातील पावसाच्या पुराचा शिरकाव झाला. त्यामुळे मंदिराच्या आतील गाभाऱ्यासह संपूर्ण सभा मंडपाचा भाग पुराच्या पाण्याने वेढला गेला आहे.

सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केळीच्या बाग अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे. बारशी तालुक्यातील सांवदर या गावातील खजुराच्या बागेच मोठं नुकसान झालंय. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागाला पावसाने झोडपलंय. जोरदार पावसामुळे येरळा नदीला पूर आला आहे. सांगली शहरात ही जोरदार पाऊस बरसला आहे. त्यामुळे या पावसाचा आठवडी बाजाराला मोठा फटका बसला आहे.

तिकडे कोल्हापूरच्या इचलकरंजीत कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कृष्णा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेलेत. कोल्हापूर घाट माथ्यावर पाऊस सुरूच आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील बारा बंधारे चक्क पाण्याखाली गेलेत. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातल्या नेर तलावाच्या सांडव्यावरून सुद्धा पाणी वाहू लागलंय.

Published on: May 29, 2025 08:13 AM